प्रतिनिधी/सातारा
येथील समर्थ मंदिर परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एकास शाहुपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेश परशुराम जांभळे (वय-३१, वर्षे रा.४०८ मंगळवार पेठ, सातारा) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकीसह 23 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहुपुरी पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक वायकर यांना बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सातारा शहरातील समर्थ मंदीर ते बोगदा रोडवर उमेश पानशॉपचे आडोशास मोटार सायकल (क्र. एमएच -११- सीएन -९९११) वर बसून बेकायदा बिगर परवाना विदेशी दारुची चोरटी विक्रि करीत आहे. या माहितीनुसार आज, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास छापा टाकला असता एक युवक दुचाकीवर दारू विकत असताना निर्दशनास आले. यावेळी एकाने तेथून पळ काढला. तर दुचाकीवरील उमेश जांभळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या गाडीच्या डिक्कीतून विदेशी दारुच्या बाटल्यासह २३ हजार५७० रुपयांचा हस्तगत करून त्याच्यावर प्रोव्हीबीशन कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









