अचूक बातमी ‘तरुण भारत’ची, सोमवार सकाळी 11.30
● रविवारी अहवालात 1,212 बाधित
● पॉझिटिव्हिटी रेट 23.17
● 5,231 जणांची तपासणी
● सातारा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
● लॉकडाऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. मात्र, शुक्रवारच्या उच्चांकी 1,543 आकड्या नंतर शनिवारी 1,395 रविवारी 1,434 तर सोमवारी 1,212 अशी बाधित वाढ समोर येत आहे. हा वेग थोडासा मंदावताना दिसत असला तरी आता जिल्ह्यात लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत.
सोमवारी रात्रीच्या अहवालात 1,212 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर सोमवारी आलेल्या अहवालात 1212 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण पाच हजार 231 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,212 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 23.17 असा आहे. जिल्ह्यात सातारा 606, खटाव 531, खंडाळा 557, कोरेगाव 479, फलटण 495, कराड 385, महाबळेश्वर 318, वाई 247, माण 175, जावली 113, आणि पाटण 57 अशी गेल्या पंधरा दिवसात बाधित झालेल्यांची आकडेवारी आहे. यामध्ये सातारा, खंडाळा खटाव कोरेगाव फलटण, कराड, महाबळेश्वर, वाई तालुक्यांना सावरण्याची गरज आहे.
सोमवारी 1,212 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांची सविस्तर माहिती काही वेळात मिळेल.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने -4,74,673, एकूण बाधित -81,796, घरी सोडण्यात आलेले -66,948, मृत्यू -2,114, उपचारार्थ रुग्ण-12,734, रविवारी कोरोनामुक्त 342, बळी 33
अचूक बातमी ‘तरुण भारत’ची









