बाधितांपेक्षा कोरोना मुक्तीचा वेग वाढला : 631 जणांनी केली कोरोनावर मात ,425 नवे रुग्ण चोवीस तासांत 4 मृत्यू गणशोत्सवासाठी बाजारपेठा ओसंडल्या
प्रतिनिधी /सातारा
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सातारा जिह्यातील कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे सुचिन्ह असून गेल्या काही दिवसात बाधित रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱयांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मृत्यू दरही कमी होत असल्याचे दिसत आहे. दुसरी लाट कमी होत चालल्याने नागरिकांच्या गणेशोत्सवासाठी खरेदीचा उत्साह दिसत असून बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. गेल्या 24 तासात 425 नवे रुग्ण आढळले असून 631 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा – फलटण तालुक्यातील रुग्णसंख्या शंभर खाली
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 425 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. जिह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.43 टक्के आहे. गेले दहा महिने हॉटस्पॉट असलेला सातारा तालुका व त्यापाठोपाठ फलटण तालुक्यात संसर्ग कमी होत असल्याचे दिसत आहे. आजच्या अहवालात सातारा तालुक्यात 75 तर फलटणला 82 रूग्णांची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील घटते रूग्ण प्रमाण एकूण आकडा कमी होण्यास मदत करत आहे.
खटावला सर्वाधिक 94 रुग्ण
रुग्ण संख्या कमी-जास्त होणाऱया खटाव तालुक्यात आजच्या अहवालात बाधितांची संख्या 94 नोंद झाली आहे. सातारा आणि फलटणला दिलासा मिळत असताना खटावने मात्र उसळी घेतली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 4 (9882), कराड 41 (38340), खंडाळा 13 (13984), खटाव 94 (27764), कोरेगांव 35 (21361), माण 48 (17230), महाबळेश्वर 1 (4613), पाटण 11 (10098), फलटण 82 (35698), सातारा 75 (50042), वाई 13 (15529) व इतर 8 (1963) असे आज अखेर एकूण 243468 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
कोरेगाव तालुक्यात दोन मृत्यू
गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात कोरेगाव तालुक्यात दोन मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, कोरेगांव 2 व फलटण 1 असे एकूण 4 असून आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6011 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुकती वाढल्याने सक्रिय रुग्णही घटले
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 631 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गुरुवारी जिह्यात
- एकूण बाधित 425
- एकूण मुक्त 631
- एकूण बळी 04
गुरुवारपर्यंत जिह्यात
- एकूण नमूने 1894500
- एकूण बाधित 244926
- घरी सोडलेले 231626
- मृत्यू -6011
- उपचारार्थ रुग्ण–8767









