सातारा / प्रतिनिधी :
जातीनिहाय जनगणना न करता फडणवीस सरकारने कशाच्या आधारावर मराठ्यांना आरक्षणाचा एवढा मोठा टक्का दिला.हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही.कारण मराठा आमचा मोठा भाऊ आहे.भावाला आरक्षण मिळत असेल तर आम्हला आनंद आहे.पण आधीच ताटात मूठभर असताना आणि खायला साडे सहाशे जाती असताना त्याच ताटात पुन्हा मराठे वाटा कसा काय मागत आहेत, असा सवाल ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करून मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजातील काही नेत्यांनी केली आहे.विशेष आरक्षण मिळत नाही असे दिसताच मराठे आता ओबीसी आरक्षणात वाटा मागू लागलेत आहे.हे दुर्दैवी आहे.मराठ्यांना आरक्षण देण्यात ओबीसीचा कधीही विरोध नव्हता.परंतु त्यांनी ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालू नये, अशी आमची मागणी आहे.आता मराठयांचा ओबीसी आरक्षणावर डोळा असल्याचे दिसून येते.हे निषेधाहार्य आहे.तुम्ही खुशाल आरक्षण घ्या, त्यासाठी ठाकरे सरकार तुमच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढते आहे.परंतु तुम्ही जर ओबीसी आरक्षणाचा टक्का मागत असाल तर ओबीसी कदापि होऊ देणार नाही.तसे झाले तर तमाम ओबीसी समाज एकजूट होऊन पेटून उठेल ती आग महाराष्ट्राला सोसणार नाही.
Previous Articleहवाई दलाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच सामील होणार राफेल
Next Article सोलापूर : पंढरीत पत्रकारांचे आत्मक्लेश आंदोलन









