शाहूपुरी : सातारा प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असली तरी देखील सातारा शहरातील अनेक फळ विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा चोरीछुपे वापर करीत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर व विक्री केली जात आहे.
साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा परिसरात फळविक्रेत्यांचे गाडे लागलेले असतात. त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना विक्रेते प्लास्टिकपिशव्यांमधून फळे देत असतात. ग्राहकांनी मागणी केलेली नसली तरी प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.









