प्रतिनिधी / गोडोली
सातारा जिल्हयात रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा आपल्या परीने काम करत असली तरी त्यांच्यावर ताण येत आहे. सातारा जिल्हयात अनेक ठिकाणी विशेषतः इंजिनयरिंग, फार्मसी, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून आरोग्य सुविधा पुरवल्यास त्याचे तातडीने कोविड सेंटरमध्ये रुपांतर होऊ शकते, असे झाल्यास रुग्णांना बेडची उपलब्धता त्वरित होऊ शकते. तरी जिल्हाधिका-यांनी तातडीने याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
निवेदनात, सातारा जिल्हयात काही दिवसांपूर्वी कमी असणारी रुग्णसंख्या सध्या झपाटयाने वाढत आहे. दररोज 200 रुग्ण सापडणारी संख्या आज 600 ते 700 च्या घरात गेली आहे. जिल्ह्यात रोज रुग्ण संख्या वाढत असून सामान्य रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. मेडिकलक्लेम असलेले, राजकीय वरदहस्त, डॉक्टरांच्या गोतावळ्यातील रुग्णांना व्हिआयपी उपचार मिळत आहेत. परंतु सर्वसामान्यांना अनेक ठिकाणी रुग्णांना तातडीने बेडची उपलब्धता होत नाही. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे.
अद्याप जंबो कोविड हॉस्पिटलच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही, अशा स्थितीत प्रत्येक कॉलेजमध्ये विशेषतः आयुर्वेदिक,फॉर्मसी इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतींचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करणे शक्य आहे. या इमारतींमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून केवळ आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास त्यांचे हॉस्पिटलमध्ये रुपातंरण करणे शक्य आहे. सध्याच्या काळात ते तातडीने होईल असे झाल्यास कोणताही रुग्णाला उपचारासाठी बेडची उपलब्धता तातडीने होऊ शकते.
अनलॉक 4 मध्ये अजूनही महाविद्यालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील इंजिनियरिंग, फॉर्मसी, आयुर्वेदिक कॉलेजच्या इमारती ताब्यात घेऊन त्याचे रुपातंरण कोविड हॉस्पिटलमध्ये करावे ही विनंती. सध्या कोविड सेंटर उभे करण्यासाठी महाविद्यालयाच्या इमारती हा सर्वोत्तम पर्याय असून आपण याविषयी तातडीने निर्णय घेऊन प्रशासनास त्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती. हा निर्णय झाल्यास जिल्हयात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन त्यांना रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करता येईल, असे म्हटले आहे.
रोज ६००पेक्षा अधिक रुग्ण आणि मर्यादित जागा यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या कॉलेजमधील ‘कोविड सेंटर’ची शिक्षण संस्थांनी जबाबदारी घेऊन सामाजिक बांधिलकीतून योगदान दिले पाहिजे. सामाजिक संकटातून सावरण्यासाठी प्रत्येकाने आरोप- प्रत्यारोप करून प्रशासनाचा ताण वाढविण्यापेक्षा शक्य ती जबाबदारी स्विकारली तर हे महासंकट दूर होईल,अशी अपेक्षा सुशांत मोरे यांनी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









