पंधरा दिवसापासून व्यवहार खोळंबले
पोस्ट विभागाच्या ग्राहकांना फटका
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सातारा / प्रतिनिधी
ब्रिटिशांनी सुरू केलेली टपाल सुरू सध्याच्या व्हाट्सअपच्या जमान्यात सुरू आहे.टपाल विभागाने बदल केले आहे.त्यापैकी एक म्हणजे पोस्ट बँक ही सेवा.सातारा शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात असणारे एकमेक धनादेश स्कनिंग मशीन गेल्या आठ दिवसापासून बंद आहे.खातेदारांचे धनादेश अडकून पडले आहे.बँकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा शहरात सिटी पोस्ट या कार्यालयात काही महिन्यांपूर्वी पोस्टाची बँक सुरू केली आहे.त्यामध्ये अनेकांनी आपले व्यवहार सुरू केले आहेत.काळानुसार बदल होत असलेल्या पोस्ट विभागावर शहरातील अनेक खातेदारांचा विश्वास आहे.लॉक डाऊन काळात गेल्या पंधरा दिवसापासून या पोस्ट कार्यालयात एकमेव असलेले धनादेश तपासणी मशीन बंद पडले आहे.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेकांनी नाराजी व्यक्त केली.अधिक माहितीसाठी पोस्ट विभागाचा फोन ही बंद असल्याने दुरुस्ती होणार केव्हा हे समजू शकले नाही.
Previous Articleकोल्हापूर : स्लो डाऊनमुळे अभियांत्रिकी प्रवेशाकडे पाठ
Next Article सांगली :ऑक्सिजनसाठी डॉक्टरच बनले चालक









