प्रतिनिधी/ सातारा
गतवर्षी व चालु वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱया वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 8 लाख 50 हजारांचा दंड वसुल करून पावणे तीनशे वाहने जप्त केल्याची माहिती सातारा शहर पोलीस प्रमुख आण्णासाहेब मांजरे यांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असे वारंवार आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तरीही वाहनधारक हे नियम मोडीत काढत आहेत. अशा वाहनधारकांवर गतवर्षी व चालुवर्षी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दुकानदरांनाही ही सुचना आहे. की, विनाकारण दुकाने उघडु नका, नियम मोडु नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल. ही कारवाई पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे मांजरे यांनी सांगितले.









