प्रतिनिधी / सातारा
मास्क न घालता फिरला तरीही दंडात्मक कारवाई केली जाते. विनाकारण बाहेर फिरले तरीही गुन्हा दाखल केला जात आहे. हे सर्व प्रशासन नागरिकांच्या हितासाठी करत आहेत.
परंतु हिच प्रक्रिया राबवणारे सातारा पोलीस दलातील काही मंडळी मास्क हनुवटीखाली अन् इतरांवर कारवाई करण्यात दंग आहेत, असे चित्र तरुण भारतच्या हाती गुरुवारी सकाळी राजवाडा परिसरात दृष्टीस पडले. सातारा पोलिसांनीच मास्क नाकाखाली घेवून दुसऱ्यावर करणे योग्य आहे का ? अशी चर्चा सुरु होती.









