प्रतिनिधी / सातारा
सिरीयल किलरने पैशाच्या हव्यासापोटी चार खून करून घाटात मृतदेह टाकल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.सांगली जिल्ह्यातील बामणोली येथील तीन जणांचे मृतदेह आढळून आले होते. चौथा मृतदेह काल पासून मार्ली घाटात शोधण्याचे कार्य सुरू होते.
पोलीस दलाच्या सहकार्याने आज सकाळी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी चौथा मृतदेह शोधून काढला आहे. मृतदेहाची केवळ हाडे सापडली आहेत. कपडे आणि मोबाईल मिळून आला आहे. पोलीस संशयित सिरीयल किलरची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाची दाहकता मोठी असुन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष घातले आहे.
Previous Articleकर्नाटकः मंत्री शशिकला जोल्ले कोरोना बाधित
Next Article गोव्याच्या सीमा खुल्या पण महाराष्ट्राच्या सीमा बंदच








