प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत सध्या बांधकाम विभागाला तेवढे दिलीप चिद्रे याच्या रुपाने अभियंता मिळाले आहेत. बाकीच्या पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभागाला पूर्णवेळ कायमस्वरुपी अधिकारी नाहीत. त्यामुळे या विभागाचा कारभार असातसाच सध्या सुरु आहे. आरोग्य विभागाचा कारभार तर एका कारकुनाकडे आहे. पालिकेच्या या विभांगाना पुर्णवेळ अधिकारी कधी मिळणार अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेत आरोग्य विभागातले तात्कालिन आरोग्य निरिक्षक शिवदास साखरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार हा राजेंद्र कायगुडे यांच्याकडे गेला होता. कायगुडे यांच्यासह गणेश टोपे, प्रवीण यादव हे तात्त्कलिन उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासोबत कारवाईत सापडले तेव्हापासून आरोग्य विभागाला नवीन अधिकारी नव्हता. आरोग्य विभागाचा गाढा पुढे चालू ठेवण्यासाठी स्थावर जिंदगीत असलेल्या एका लिपीकास पदभार तात्पुरता सोपवण्यात आला. तर त्यांच्या कामकाजाबाबत सतत कुठे ना कुठे चर्चा होत आहे. तसेच विद्युत विभागामध्ये साळुंखे हे अभियंता असून नसल्यासारखे होते. त्यांच्यानंतर सावळकर हे राज्य सेवेकडून आलेले अभियंता आहेत. त्यांची बदली वाई पालिकेत झाली आहे. तरीही ते सातारा आणि वाई या दोन पालिकेचे कामकाज करतात. पाणी पुरवठय़ाचे अभियंता द्विग्विजय गाढवे यांना पाचगणी येथे बदली झालेली आहे. तसेच बदली होवूनही ते सातारा व पाचगणी येथे काम करतात. सातारा पालिकेत अधिकाऱयांची कमरता असून राज्य शासनाकडून जसे दिलीप चिद्रे या अभियंत्यांची अचानक साताऱयाला बदली झाली तसेच इतर अभियंते व कार्यक्षम अधिकारी आणावेत अशी मागणी होत आहे.








