पालिकेची सभा सोशल डिस्टनन्सने छत्रपती शाहू कला मंदिरात घेण्यास परवानगी देण्याची केली मागणी, व्हीसीद्वारे सभा घेण्यास होत आहे तांत्रिक अडचण
प्रतिनिधी/सातारा
पालिकेची सर्वसाधारण सभा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून झालेली नाही. शासनाच्या निर्देशानुसार व्हीसीवर स्थायी सभा घेण्याचा प्रयोग केला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे तो यशस्वी होवू शकला नाही. त्यामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा ही प्रत्यक्ष उपस्थितीत सोशल डिस्टनन्स ठेवून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे अशी मागणी नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केलेली आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नगरविकास विभागाचे सचिव यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की नगरविकास विभागाच्या संदर्भ पत्रानुसार कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगाने मार्गदर्शन सूचनेप्रमाणे स्थानिक स्वराज संस्थांनी सभा, बैठका पुढील आदेश येई पर्यंत व्हीसीवरच घेण्यात याव्यात असे आदेशीत केले आहे.त्याच प्रमाणे सातारा नगरपालिकेची स्थायी समितीची सभा दि.13 व 14 ऑगस्ट रोजी व्हीसीद्वारे घेण्यात आली होती.परंतु नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय आल्याने दि.13रोजी सभा तहकूब करून दि.14रोजी घेण्यात आली.त्या सभेत खूप व्यत्यय येत होता.स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या दहा असताना व्हीसीवर खूप व्यत्यय येत होता.पालिकेचे नगरसेवक 44 आहेत.त्यामुळे सभा पार पाडताना खुप अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.यापूर्वी पालिकेने छत्रपती शाहू कला मंदिर येथे सोशल डिस्टनन्स पाळून प्रत्यक्ष उपस्थितीत दि.10 जुलै रोजी घेण्याचे नियोजन केले होते.मात्र, शासन आदेशानुसार ती स्थगित करण्यात आली होती.त्यानंतर सभा घेण्यात आली नाही.तरी ही सभा व्ही सी ऐवजी प्रत्यक्ष उपस्थितीत सोशल डिस्टनन्स पाळून घेण्याबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Previous Articleमेलबर्नमध्ये 26 ऑक्टोबपर्यंत लॉकडाऊन
Next Article कोल्हापूर : मराठी चित्रपटांचे अनुदान रखडले









