सातारा / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका संघाच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सातारा पालिकेच्या शाळेचे शिक्षक प्रवीण पवार यांना प्रदान करण्यात आला. लोणावळा येथे नुकताच हा पुरस्कार वितरण प्रदान सोहळा नुकताच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार संजय जगताप, दत्ता जगताप आदी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सातारा पालिकेच्यावतीने अभिनंदन होत आहे.









