शहर विकास, आरोग्य विभागतले कर्मचारी बाधित झाल्याचे समजताच सॅनिटायझरकोरोना कक्ष तेवढा सुरू पालिका कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोनाची दहशत
प्रतिनिधी / सातारा
पालिकेत एकेका विभागात कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने पालिका कर्मचारी पालिकेत यायलाच भिऊ लागले आहेत. शुक्रवारी सकाळी पालिकेत शहर विकास विभाग आणि आरोग्य विभागतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती कळताच पालिकेचे दोन्ही शटर पुन्हा डाऊन झाले आहेत. केवळ कोरोना कक्ष सुरू असून पालिकेची पूर्ण इमारत सकाळपासून हातपंपाने सॅनिटायझर करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सातारा पालिकेत गेल्या आठ दिवसापासून पुन्हा कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. तरीही पालिकेचे कामकाज सुरू होते. गुरुवारी जन्म मृत्यू नोंदणी विभागातील महिला कर्मचारी बाधित झाल्याचे समजताच तेवढ्या विभागाला लॉक लावून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले. आज सकाळी शहर विभागतले एक कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून थंड, ताप, घसा खवखवत असल्याने ते घरीच आहेत. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा समजताच इतर कर्मचाऱ्यांनी विभागात न जाणे पसंद केले.
तर आरोग्य विभागातील एक आरोग्य निरीक्षक चार दिवसांपूर्वी एका रुग्णालयात उपचार घेत आहे तर दुसरा आरोग्य निरीक्षक ही पॉझिटिव्ह आल्याचे समजताच संपूर्ण पालिका बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पालिकेची इमारत सकाळी हँड पंपाच्या सहाय्याने सॅनिटायझर करण्यास सुरुवात केली होती. याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना विचारले असता ते म्हणाले की आजच्या दिवस पालिका बंद ठेवली आहे. फक्त कोरोना कक्ष सुरू ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.









