प्रतिनिधी / सातारा
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुलला भेट देवून या संकुलातील विविध मैदानांची पहाणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुलातील मुख्य मैदान, बास्केट बॉल मैदान, टेनिस मैदान, खो-खोचे मैदान, व्हॉलीबॉल मैदान, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल व व्यायाम शाळेची पहाणी केली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी क्रीडा संकुलातील विविध मैदान व जलतरण तलावाच्या दुरुस्ती करावयाची असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी मैदान निहाय व जलतरण तालवाच्या दुरुस्तीसंदर्भात येणाऱ्या र्खचाची माहिती जाणून घेतली.









