प्रतिनिधी / सातारा
राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे दिनांक 29 जून रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सोमवार दिनांक – 29 जून रोजी सकाळी ११ वा. २६०, मंगळवार पेठ, कराड निवासस्थान येथून खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण.
सकाळी ११.४५ वा. शासकीय विश्रामगृह, सातारा येथे आगमन. सकाळी १२.३० वा. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत सातारा जिल्ह्याबाबत कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक. ठिकाण-जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा.
सोईनुसार सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ग्रेड सेप्रेटरची पाहणी. सायं. ५ वा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागे संदर्भात चर्चा व भेट.(सातारा-कोरेगांव रोड हायवे ते इरिगेशन कॅनॉल सर्व्हेबाबत), सोयीनुसार सातारा येथून २२०, मंगळवार पेठ, कराड येथील निवासस्थानी आगमन व राखीव