सातारा/प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिध्द व्यापार्याचा दोन कोटी रूपयाच्या खंडणीसाठी सातार्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. चंदन कृपादास शेवानी (वय-48,रा. बंडगार्डन) असे या खून झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, आज, रविवारी दुपारच्या सुमारास सातारा जिल्ह्रयातील पाडेगाव ता. खंडाळा गावच्या कॅनॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती गावकर्यांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी याठिकाणी एका अज्ञात मृतदेहाच्या डोक्यात गोळी झाडल्याचे लक्षात आले. या घटनेचा लोणंद पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह चंदन शेवानी यांचा असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.









