आकाशकंदील व भेटकार्ड तयार करण्यासाठी शिक्षण विभागाची ऑनलाईन कार्यशाळा
सातारा / प्रतिनिधी
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व प्रभावती कोळेकर , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संकल्पनेतून प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कला विषयांतर्गत पर्यावरण पूरक आकाशकंदील व भेटकार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना त्याच बरोबर शिक्षकांना या कार्यशाळेची माहिती मिळण्यासाठी सोमवार दि.०९ रोजी सायंकाळी ७ वाजता कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री.खंदारे साहेब उपशिक्षणाधिकारी, मंगल मोरे, विस्तार
अधिकारी, प्रशांत भोसले, ग्यान प्रकाश फौंडेशन याची उपस्थिती होती. सतीश गायकवाड यांनी (कला शिक्षक महासंघजिल्हा अध्यक्ष) स्वागत केले.
मुलांच्या गुणवत्ता पूर्णशिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने दिवाळी निमित्त आकाशकंदील पर्यावरण पूरक कसे बनवावे या संदर्भात कुमार सुतार, श्री शिवाजी विद्यालय कराड यांनी माहिती देत
प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये तीन प्रकारचे आकाशकंदील तयार करुन दाखवित असताना आकाराचे प्रमाण, रंगसंगती इ. माध्यमातून आकर्षक आकाश कंदील तयार करुन दाखविले. त्याच बरोबर विद्यार्थी -शिक्षक यांच्या मनात त्याविषयी आवड निर्माण करुन दिली.
सतीश गायकवाड यांनी भेट कार्ड तयार करण्यासाठी त्याची सर्व माहिती दिली. या भेट कार्डचा वापर आपण आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, दिवाली (दिपावली) आपल्या मित्र-मैत्रिणीचा शालेय चित्रकला, रांगोळी, निबंध , वक्तृत्व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या भेटकार्डचा वापर करत असतो. याविषयी माहिती
देऊन भेट कार्ड आपण आपल्या आवडीनिवडीनुसार तयार करत असतो. त्या प्रमाणे सतीश गायकवाड यांनी टाकाऊ कागदाच्या तुकडयापासून भेट कार्ड सुंदर आकर्षक तयार करुन दाखविले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना रंगात खेळ
(रंगाबरोबर)रंगमिश्रणातून अनेक रंग तयार होत असतात त्यांचा आनंद त्याविद्यार्थ्यांना मिळत असतो. भेट कार्डची(साईज) कशी असावी त्याविषयी माहिती देऊन त्यांना प्रात्यक्षिक तयार करुन दाखवली.पर्यावरण पूरक आकाशकंदीलाचे प्रात्यक्षिक कुमार सुतार सरांनी व भेटकार्ड प्रात्यक्षिक सतीश गायकवाड दाखविले. या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी- शिक्षकांनी घेतला.
तसेच या पर्यावरण पूरक आकाशकंदील व भेट कार्ड कार्यशाळेस राजेश क्षीरसागर शिक्षणाधिकारी (माध्यमिक),यांची उपस्थिती होती. त्यांनी सांगीतले की कला शिक्षकांना कला, कार्यानुभव विषयांतर्गत असणाऱ्या विविध उपक्रमांसाठीनेहमी पाठबळ देऊ, या दिवाळी सुट्टीच्या आणि कोरोना-१९ च्या काळात विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक आकाशकंदील व
भेट कार्ड तयार करण्यासाठी या कार्यशाळेचे नियोजन करण्यास मार्गदर्शन केले. हि कार्यशाळा यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल कलाशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. त्याच प्रमाणे सदरची कार्यशाळा हि झूम अॅपवर ऑनलाईन झाली.त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण प्राथमिक शिक्षण विभाग या फेसबुक पेजवर प्रशांत भोसले यांनी केले. प्रदीप कुंभार यांनी तंत्रसहाय्य
केले.
या कार्यशाळेस श्री.खंदारे साहेब (उपशिक्षणाधिकारी), मंगल मोरे (विस्तार अधिकारी), प्रभावतीकोळेकर , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल शिखरे सर कोल्हापूर विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, उपाध्यक्ष प्रदीप कुंभार, आनंदाराव शिंदे, कोषाध्यक्ष पुरूषोत्तम सावंत सर, शिक्षण विभागातील उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रात्यक्षिक देणारे कुमार सुतार, सतीश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.









