केळवली धबधबा परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन; प्रशासनाने लक्ष घालण्याचे आवाहन
परळी / अमर वांगडे
परळी खोऱ्यातील पर्यटन क्षेत्रांमध्ये दरवर्षी नवीन ठिकाणांचा समावेश होत असतो. मात्र गावातील वादावादी आणि मतभेदांमुळे काही पर्यटन क्षेत्रे अजूनही पर्यटकांच्या नजरेत पलीकडेच आहेत. त्यातीलच केळवली हा धबधबा. या ठिकाणी आल्यावर निसर्गाचा अद्भुत असा निसर्गसौंदर्य पाहावयास मिळतो. मात्र ग्रामस्थांची एकी नसल्याने पाहिजे असा केळवली धबधबा नावारूपाला आलेला नाही. मात्र ठोसेघर कास या ठिकाणी कसून चौकशी होत असल्याने पर्यटकांनी केळवली धबधबाकडे रीघ लावल्याचे दिसत आहे ग्रामस्थांकडून बॅनर लावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले तरी त्याला हरताळ फासून उच्छाद मांडला जात आहे त्यामुळे पर्यटकांना हो जरा दमानं कोरूना कमी झाला आहे संपला नाही हे भान राहू द्या अशी ग्रामस्थांकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील कठोर निर्बंध हे शितील करण्यात आले होते मात्र पुन्हा रुग्णसंख्या ही मंद गतीने वाढत जरी असली यामुळे जिल्ह्यात पुन्हा नियम लावले गेले आहेत. यामुळे जिल्ह्यात दोन नंतर संचारबंदी लागू करण्यात आली मात्र पहिला पाऊस हा बऱ्यापैकी झाल्याने धबधबे फेसाळले तर डोंगरांनी ही हिरवा शालू नेसलेला हे पाहण्यासाठी शहरातून शेकडो पर्यटक हे परळी खोऱ्यातील केळवली धबधब्याकडे दाखल होत आहेत. पर्यटक जोमात ग्रामस्थ कोमात गेल्या सारखीच परिस्थिती होत आहे. ना मास्क, ना कुठलं सोशल डिस्टन्स यामुळे कोरोनाचा फैलाव ही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो यामुळे आशा बेफाम पर्यटकांना अटकाव घालणार तरी कोण? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यटनाचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याचा नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रात आहे या ठिकाणी नानाविध प्रकारचे दुर्मिळ प्राणी व वनस्पती या आढळून येतात. हेच निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी जिल्ह्यात लाखो पर्यटक हे दाखल होत असतात. मात्र जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने जिल्ह्यातील शिथिल केलेले नियम हे पुन्हा कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानाच्या वेळाही कमी करण्यात आल्या मात्र दुर्गम भागातील पर्यटन क्षेत्रावर होणारी गर्दी मात्र प्रशासनाला दिसेनाशी झाली आहे. विकेंड म्हटला की सातारकर हे परळी दऱ्याखोऱ्यातील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी दाखल होत आहेत. ना मास्क, ना सामाजिक आंतर यामुळे ग्रामस्थांमध्ये कोरोनाची धास्ती ही वाढली आहे.
केळवली पासून काय-काय बघू शकता
परळी खोरे निसर्गाचा खजिना मांनला जातो याचा खोऱ्यातून केळवली धबधबा कडे जाण्याचा मार्ग आहे सज्जनगड बोगदा मार्गे आल्यानंतर उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य त्यानंतर पांडवकालीन मंदिर तसेच भात शेतीतून पुढे घाट रस्त्याने पुढे जाऊन या धबधब्याचा अनुभव घ्यावा लागतो.
केळवली जळकेवाडी कात्रे वाडी रस्ता होणार कधी ?
परळी खोऱ्याला कास पठाराची जोडण्याकरिता केळवली जळकेवाडी कात्रे वाडी नावली धावली असा मार्ग हा तयार करण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे पावसाळा आला की या मार्गाची आठवण पर्यटकांना आवर्जून होत असते कास पठाराचे सौंदर्य आपल्या नजरेत सामावून तसेच केळवली धबधब्याकडे उरमोडी जलाशयाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दुसऱ्या मार्गाने देण्यापेक्षा हाच मार्ग अवलंबला जातो पण तो रस्ता पूर्ण नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे या रस्त्यांची प्रतीक्षा कधी संपणार असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.
पर्यटकांकडून नियमांना हरताळ
कोरोना हा परळी खोऱ्यातील गावा-गावात थैमान मधून गेल्या काही महिन्यांपासून शांत झाला आहे मात्र या वाढत्या पर्यटकांमुळे याचा धोका पुन्हा येण्याची शक्यता आहे यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी सामाजिक आंतर मास्कचा वापर अशा पद्धतीचे बोर्ड लावण्यात आले आहेत तसेच सामाजिक आंतर पाळून निसर्गाचा आनंद घ्या असे देखील आवाहन करण्यात आले आहे मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत पर्यटक हे राजरोसपणे बेफिकीरपणे वावरत असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आरोग्य विभागाने अशा दुर्गम पर्यटन स्थळावर अचानक जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धबधबा परिसरात रोजगार निर्मितीची गरज
परळी खोऱ्यातील बहुतांश तरुण हे मुंबई पुणे येथे चाकरणामे म्हणून कामासाठी स्थलांतरित होतात मात्र निसर्गाचा आविष्कार एवढा आपल्याच भागात असून देखील त्याचा विकास न झाल्याने रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे हेच निसर्गसौंदर्य जतन करून ग्रामस्थांनी रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज आहे.