सरपंच गणेश चव्हाण यांची निवेदनाद्वारे मागणी
वार्ताहर/कास
परळी खोऱ्यातील केळवली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची सुट्टीच्यादिवशी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढु शकतो. तर काही पर्यटक ग्रामसमीतीच्या सुचनांचे पालन करत नसून आरेरावीची भाषा करतात. त्यामुळे या पर्यटकांवर पोलीस बंदोबस्त लावून कारवाई करावी अशी मागणी केळवलीचे सरपंच गणेश चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक हंकारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू झाल्याने परळी खोऱ्यातील धबधबे मोठया प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. त्यातील केळवली धबधबा हा पर्यटकांचा खास आकर्षण ठरत असल्याने सुट्टीच्या काळात पर्यटकांचा लोंढा वाढत आहे. पर्यटकांची वाहने एसटी बस फिरविण्याच्या ठिकाणी पार्क करत असल्याने बस वळविण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. ग्रामसमीती वारंवार विनंती वजा सुचना करूनही पर्यटक कोरोनाच्या नियमांसह अन्य नियमांना तिलांजली देत आहेत. याला आवर घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









