सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्यवयीन युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडछाड केल्याप्रकरणी परळी येथील इम्रान सिराज मुलाणी याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नव्हती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन दि.5 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता पीडित युवतीचे इम्रान मुलाणी याने इन्स्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट काढले. तसेच तिचे फोटो अपलोड करुन इतर व्यक्तींशी चॅटींग करुन त्या युवतीची बदनामी केली. त्याप्रकरणी त्याच्यावर भा.द..वि.स.354 डी,2, 507, 509 यासह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे हे तपास करत आहेत.









