प्रतिनिधी / सातारा
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा असे अभंगातून पतंगाची महती संत तुकाराम महाराजांनी केला आहे. सातारा शहरात तेच पतंग गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हे पतंग आकाश झेप घेत आहेत. तर पतंग पाडापाडीचे व सगळ्यात उंच कोणाचा पतंग जाणार याच्या स्पर्धा रंगत आहेत.
पतंग हा खेळ फार पूर्वी पासून खेळला जातो. त्याचाच एक दाखला संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळून येतो. काळानुसार पतंग उडवण्याचा खेळ बदलत गेला. पतंग बदलत गेले. गेल्या काही वर्षांमध्ये चीनच्या पतंग बाजारात दिसत होते. यावर्षी चीन बनावटीचा मांजा आणि पतंग विक्रीला ठेवत नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. सध्या कोरोनाचा अनलॉक पाच सुरू झाला आहे. गेले सहा महिने घरात बसून अक्षरशः चिमुकल्यासह सर्वजण वैतागून गेले आहेत. यातून बाहेर पडावे तर कोरोनाची भीती अन् घरात बसावं तर घर खायला उठते. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून सातारा शहरात सायंकाळी प्रत्येक गल्लीत पतंग उडवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गर्दी पहायला मिळते. दुसर्यांच्यापेक्षा आपला पतंग कसा उंच जाईल, आपला पतंगाने दुसऱ्याचा पतंग कसा कापता येईल, अशी स्पर्धा सुरू झाल्याचे पहायला मिळते.
बाजारात 5 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत पतंग
सातारा शहरात गुरुवार परज येथे पतंग विक्रेते आहेत. त्यांच्याकडे आय लव्ह इंडिया, डोरोमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन अशा वेगवेगळ्या प्रकारचे 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे पतंग मिळतात. अगदी भारतीय बनावटीचा मांजा देतो, असे विक्रेते जावेद शेख हे सांगतात.
शहर पोलिसांची दंडात्मक कारवाई
कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी टाळावी, मास्क वापरावा असे प्रशासन वारंवार सांगत आहे. मात्र, पतंग खरेदी करायला गेलेल्यांच्या तोंडावर मास्कच नसल्याने आणि गर्दी आढळून आल्याने शहर पोलिसांनी दंड केले त्यामुळे पतंग विक्री करणाऱ्यांनी चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला होऊ नये म्हणून काळजी घेऊ लागले आहेत.
पक्ष्यांना इजा, प्राणी प्रेमी आक्रमक
शहरात काही कबुतर पाळणारे आहेत.ते आपल्या कबुतरांना दररोज सायंकाळी मोकळे सोडतात. तर पुन्हा सातारा शहरात फिरून तेथेच परत येतात. त्यांना ही धोका असून काही पक्षी ही जखमी झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे पतंग उडवण्याला प्राणी प्रेमीकडून विरोध होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









