प्रतिनिधी / सातारा
सातारा पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात बसविलेल्या गणपतीच्या आरासीला अचानक दहा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. याची माहिती कनिष्ठ प्रशासन अधिकारी रचना गोसावी यांना पहिले पेटल्याचे दिसताच त्यांनी आरडा ओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून वाहतूक पोलीस, पारधी समाजाचे नागरिक, पंचायत समितीचे कर्मचारी यांनी ही लागलेली आग आटोक्यात आणली.
सुदैवाने गणपती मूर्तीला काहीच झाले नाही. मात्र या ठिकाणचा पडदा पेटून वायरिंग जळाले होते. वेळीच वाहतूक पोलीस आणि पंचायत समितीचे रचना गोसावी, विक्रम मोहिते, भिसे, ब्रम्हेद्र जंगम, अनिल ढेंब, वसंत धनावडे यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर गणपतीची आरती घेण्यात आली. गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी या घटनेची माहिती फोन वरून घेतली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









