प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढत चाललेला प्रसार पाहून सातारा पंचायत समितीने ही आता विनाकारण येणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी गेट बंद ठेवले आहे. पदाधिकाऱ्यांनी मायक्रो कंटेंन्मेंट झोनमधून येणाऱ्या गटविकास अधिकारी यांनाही न येण्याची विनंती केली आहे. प्रत्येक जणांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. दोन दिवस पंचायत समितीचे कामकाज बंद ठेवण्याबाबत खलबते झाल्याचे समजते.
सातारा पंचायत समितीच्या कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता.कोणीही सोशल डिस्टनन्स पाळत नव्हते.त्याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निर्णय घेतला.
कोरोनामुळे परिस्थिती बिकट होण्याआधीच काळजी घेण्यात आली तर बरे. म्हणून सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, माजी सभापती मिलिंद कदम, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, आशुतोष चव्हाण यांनी कडक नियम करण्याचे सूचित केले. पंचायत समितीचे गेटच बंद ठेवून पंचायत समितीत यायचे असेन तर काय काम आहे, हे बाहेरच विचारना करून त्याचे थर्मल स्कॅनिंग करत प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, पदाधिकारी यांनी जे कर्मचारी कंटेंन्मेंट झोनमधून येतात त्यांना घरीच थांबा विशेष करून गटविकास अधिकारी यांनाच विनंती केली आहे. तसेच सर्व इमारत सॅनिटायझर करण्यासाठी दोन दिवस कामकाज बंद ठेवण्यासाठी खलबते झाल्याचे समजते.








