सातारा / प्रतिनिधी
नृत्य क्लासेस पूर्ववत सुरू करण्यात यावेत अशी मागणी नृत्य परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येत्या 2 दिवसात सर्व क्लासेस पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती नृत्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव पंकज चव्हाण यांनी दिली.
निवेदन देताना सातारा जिल्ह्यातील नृत्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यानी उपस्थिती दर्शीविली. पश्चिम महाराष्ट्र सचिव पंकज चव्हाण, सातारा अध्यक्ष अक्षय सावंत, खजिनदार वैशाली राजेघाटगे, प्रसार प्रमुख – विकी जगताप, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष प्रतीक धनवडे, जावली तालुकाध्यक्ष अजिंक्य लकडे, सदस्य ओंकार भंडारी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले तसेच त्यावर सखोल चर्चाही केली. यामध्ये नृत्यकलाकरांच्या सर्व समस्या सुद्धा परिषदेमार्फत मांडण्यात आल्या आणि क्लासेस परत सुरू झाल्यानंतर सर्व मुलांची कशाप्रकारे काळजी घेतली जाणार आहे हे ही सांगण्यात आले तसेच त्याबद्दलचा इत्तमभूत महिती देणारा एक व्हिडिओ सुद्धा सादर करण्यात आला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह सरांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून येत्या 2 दिवसात सर्व क्लासेस पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जाहीर करणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले. त्यामुळे सर्व नृत्यकलाकरांमध्ये नविन उमेद तयार झाली. त्यांच्या निर्णयाचे सातारा जिल्हा नृत्य परिषदेच्या सर्व सदस्यांनी मनपूर्वक आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









