वार्ताहर / देशमुखनगर
देशमुखनगर. ता.सातारा येथे मराठा आरक्षण रद्दचे संतप्त पडसाद उमटून कोरोनाच्या पाश्वभूमीवर युवक कार्यकर्त्यांनी घरातच मुंडण करत राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.
मराठा आरक्षण रद्द केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शनिवारी देशमुखनगर (ता.सातारा) येथे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या परिसरातील काही युवक कार्यकर्त्यांनी मुंडण करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडल्याने या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काचे अशा घोषणा देत आपल्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कामेरी लोकनियुक्त सरपंच सुंदर घाडगे यांच्यासह महेश घाडगे व इतर कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की मराठा आरक्षण बाबत राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडले असून कोरोना च्या पाश्वभूमीवर संचारबंदी व जमाव बंदीचा आदेश असल्याने सर्व नियम व अटीच्या अधीन राहून घरातच मुंडण करून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केलेले आर्थिक आरक्षण मुद्दा योग्य असून कोरोना चे संकट व संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असणार असल्याचे संकेत देत राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच मराठा आरक्षण रद्द झाले असल्याचे सुंदर घाडगे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी लोकनियुक्त कामेरी सरपंच सुंदर घाडगे, आर. डी. घाडगे, महेश घाडगे, सुनील देशमुख (नांदगाव) समाधान घाडगे, संदीप सूर्यवंशी, दीपक घाडगे यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला.