वाठार / प्रतिनिधी :
रहिमतपूरजवळ रस्त्यावर असलेल्या लोखंडी बारला धडकून झालेल्या दुचाकी अपघातात माजी सैनिक विनोद तात्याबा पवार (वय ३६ रा. वाठार किरोली ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पवार दोनच महिन्यापूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास शिवाजी बोरकर यांच्या समवेत ते दुचाकीवरून निघाले होते. रहिमतपूरजवळ रस्त्यावर असलेल्या लोखंडी बारला त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये पवार व बोरकर हे दोघेही जखमी झाले होते. या दोघांना उपचारासाठी नेत असतानाच पवार यांचा मृत्यू झाला.









