प्रतिनिधी / सातारा
शनिवारी अगदी साधेपणाने आलेले बाप्पा दीड दिवसानंतर परत आपल्या गावी मुक्कामला चालले.सातारा शहरात अनेक गणेशभक्तांनी आपल्या घरातील मूर्तीचे घरात तर काहीनी पारंपरिक पध्द्तीने पालिकेने नियोजन केलेल्या ठिकाणी विसर्जन केले.पालिकेचे पथक विसर्जन ठिकाणी तैनात होते.
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला आशा घोषणा देत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. ना वाद्य ना गुलाल ना मिरवणूक अगदी साधेपणाने पालिकेच्या पोहण्याच्या तलावावर, हुतात्मा स्मारकाकातले तळे, सदरबाजार येथील दगडी शाळेतील तळे, अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोर पालिकेच्या बागेतील तळे येथे घरगुती गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
मंगळवार तळे आणि फुटके तळे येथे हौद ठेवण्यात आले होते.दुपारपासून दीड दिवसाचे विसर्जन करण्यात आले. सोशल डिस्टनन्स पाळून विसर्जन करण्यात येत होते. पालिकेने देखरेखीकरता ठिकठिकाणी पथके नेमली होती.