प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्याकडून ३लाख ५५ हजार ८६०रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.त्या चोरट्याची सत्यम नानासो सोलके (रा. महागाव सातारा) विश्वतेज संजय पवार (रा. वेळे ता. वाई जि. सातारा) अशी नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना एक इसम सातारा शहरातील जिल्हा परिषद चौकामध्ये चोरीमधील लॅपटॉप विक्री करण्याकरीता येणार असल्याची बातमी मिळाली. त्या इसमास ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने सातारा शहरातील जिल्हा परिषद चौकामध्ये सापळा लावून मिळाले बातमीतील इसम व त्याचे साथिदारास जिल्हा परिषद चौकामध्ये ताब्यात घेतले त्याच्या कब्जामध्ये मध्ये ३लाख ५५ हजार ८६० रुपये लिनोवो कंपनीचा एकूण ४ लॅपटॉप मिळून आल्याने त्यांच्याकडे त्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी हे लॅपटॉप शाहू चौक सातारा येथील लॅपटॉप वर्ल्ड दुकानाचे गोडावून मधून दिवसा घरफोडी चोरी केल्याची कबुली दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.७९५/२०२० भादविक ४५४, ३८० हा दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील यांचे सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सातारा यांचे मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पो.हवा. सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, पो.कॉ. विशाल पवार, मयुर देशमुख, धीरज महाडिक, रोहित निकम, संकेत निकम, मोहसिन मोमीन, वैभव सावंत,चा.पो.कॉ.विजय सावंत यांनी नमुद कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला आहे.









