प्रतिनिधी / नागठाणे
दारूच्या नशेत तोल जाऊन नाल्यात पडल्याने अतीत (ता.सातारा) येथे एकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. शेखर हणमंत माने (वय.३९) असे मृताचे नाव आहे.
रविवारी रात्री जेवण करून दारूच्या नशेत शेखर माने हा गावातून रानात गेला होता.सोमवारी सकाळी गावातील काही लोकांना शेखर माने हा सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यालगतच्या नाल्यात पडलेला आढळला.याची माहिती कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.याची खबर भाऊ किरण हणमंत माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.









