प्रतिनिधी/नागठाणे
मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मत्त्यापूर (ता.सातारा) येथील वंदना शंकर घोरपडे यांच्या राहत्या घरातून अनोळखी चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पळविले होते. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने या चोरीचा कसून तपास केला.
संबंधित चोरटे हे आज बोरगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या वेळी पोलिस पथकाने सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मयूर विलास ननावरे ( वय २४, रा. विसावानाका, मूळ करंजे, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. अन्य दोघे चोरटे अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या तपास पथकात मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









