प्रतिनिधी /सातारा
दहिवडी ता. माण येथील वन परिक्षेत्राचा वनपालास दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. सुर्यकांत यादवराव पोळ (वय57) असे या वनपालाचे नाव आहे. पोळ याने ठेकेदारास बंधाऱ्याच्या कामात बिल काढण्यासाठी पैशाची मागणी केली होती. हे पैसे स्विकारताना त्याला जेरबंद करण्यात आले. मात्र, लाच लुचपत विभागाच्या पथकास बघताच त्याने पैसे टाकून दिले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्यासह संजय साळूंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









