सातारा/प्रतिनिधी
विसावानाका येथे दि.१२ रोजी कोयता गँग यांनी फिर्यादी शिवाजी संदीपान सरगर रा. २०, शिक्षक कॉलनी, जुना आर.टी.ओ. ऑफीस शेजारी, सदरबझार, सातारा यांचे ओमनी गाडी समोर मोटरसायकली आडव्या मारुन कोयत्याने गाडीची काच फोडुन फिर्यादीचे पोटाला चाकु लावुन त्यांचेकडील रुपये, २७००/- खिशातुन जबरदस्तीने काढुन घेवुन निघुन गेले. व त्यानंतर खेड फाटा सातारा येथे जावुन फिर्यादी नामे उमेश आप्पाराव गायकवाड रा.लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा.यांचे डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन, पैशाचे पाकीट त्यामध्ये रोख रक्कम ११००, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पोस्टचे कार्ड, घेवुन पळुन गेले. त्यांचेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणेत गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी हे सातारा शहर परिसरात धारदार हत्याराने गुन्हे करुन, दहशत माजवुन फरार झाले हाते.
सदरचे गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असल्याने पोलीस अधिक्षक सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील , सहा. पोलीस अधिक्षक शेख यांनी भेटी देवुन सातारा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आण्णासाहेब मांजरे व तपासी अधिकारी यांना गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पो.नि.आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उपनिरीक्षक एन.एस.कदम व त्यांचे पथकास आरोपीचा तात्काळ शोध घेवुन ताब्यात घेण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले. सदर गुन्हयातील गुन्हेगार हे सराईत असल्याने ते पुर्ण खबरदारीने अस्तित्व लपवुन बसले होते. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपींचा कसोशीने शोध घेत होते. दि- १६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील फरारी आरोपी हे गोडोली परिसरात असल्याची माहीती मिळालेने गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावला असता अभिजीत राजू भिसे (वय 18 वर्ष रा सैदापूर सातारा), अमिर सलीम शेख (वय 19 वर्ष रा वनवासवाडी सातारा) यांना अटक केली.