ऑन लाईन घेतला विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव, लाव रे तो व्हिडीओ सारखा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा, झुम एपवर दररोज विध्यार्थीना देतात शिक्षण, महिलांना अनफिट शाळा असून ही राबवतात चांगले उपक्रम, लॉक डाऊन काळात विध्यार्थी च्या शिक्षणासाठी प्रयत्न
विशाल कदम /
आधी करावे मगच बोलावे या उक्तीप्रमाणे कृती करणाऱ्या शिक्षिका म्हणजेच माण तालुक्यातील दरावस्ती शाळेच्या शिक्षिका भारती ओंबासे.त्या शाळेवर बदली होऊन आल्या अन शाळेसाठी काहीतरी नवीन करता येईल, विध्यार्थी दर्जेदार शिक्षण देता येईल यासाठी सतत उपक्रम राबवत राहिल्या.लॉकडाऊनमध्ये ही त्यांची आणि विद्यार्थी यांचे नाते कायम राहिले आहे. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन चक्क ऑनलाईन अशा पद्धतीने घेतला. तो माण तालुक्यात चांगलाच गाजला आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः अगोदर देशभक्तीपर नृत्य करून सांगितले.त्या दररोज दुपारी विध्यार्थीयाना ऑनलाईन धडे देत आहेत.
सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे अशी स्थिती जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आहे.काही पालकांकडे स्मार्ट फोन नसले तरी साध्या फोन वरून शिक्षक त्यांच्याशी संवाद साधत असतात.माण तालुक्यातील दरा वस्ती ही शाळा.ही शाळा दुर्गम अशी महिलांना अनफिट आहे.शाळेपर्यंत रस्ता नाही.तीन किलोमीटर अंतर चालत जावे लागते.अशा परिस्थितीत तेथे जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या भारती ओंबासे या उपक्रम राबवत आहेत.पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या शाळेत 24 पट आहे.लॉक डाऊन मध्ये त्या विध्यार्थीना झुम एपवरून शिक्षण देतात.या गावात मोबाईलला व्यवस्थित रेंज नसल्याने दुपारी शिकवणी घेतात.मुलं जेथे रेंज असेल तेथून त्यांच्याशी संवाद साधतात.दरवर्षी स्वतंत्र दिनाला शाळेवर सांस्कृतिक उत्सव साजरा होतो.यावर्षी कोरोनामुळे तो घेता येणार नव्हता.परंतु जेथे प्रश्न आहे तेथे उत्तर आहे.त्यांनी पालकांना फोन करून ऑन लाईन महोत्सवाची कल्पना दिली.स्वतःचा एक कोरोना प्रबोधन करणारा व देशभक्तीपर डान्स त्यांनी पालकांना पाठवला अगोदर. मग आयुष दडस,भारती दडस, आर्या दडस, भुमिका दडस,स्वरा बोराटे,स्वरा फासे,रूपांशु फासे,साईश फासे,अर्णव माळी, श्रावणी ओंबासे, सिध्दार्थ ओंबासे, समर्थ सावंत,शिवम शिंदे, श्रद्धा शेलार ही मुले आहेत.या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.एका विद्यार्थ्यांने शेतात नृत्य केले.त्या सर्वांचे एकत्र व्हिडीओ तयार केला अन स्वतः युट्युबवर अपलोड करून तो व्हायरल केला.त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.यावरून मराठीच्या एका दूर चित्र वाहिनीवर विकास जायफळे म्हणजेच डॉ.नीलेश साबळे यांच्या लाव रे तो व्हिडीओ या मालिकेचाच प्रत्यय त्यांनी राबवला आहे.त्यांचे कौतुक होत आहे.









