प्रतिनिधी / महाबळेश्वर
मागील आठवडयातील अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे दरडी कोसळून मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तूरे यांनी पाहणी केली. दरवर्षी होणारे अशा प्रकारे नुकसान होवु नये म्हणुन रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी छोटे छोटे पुल बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांना दिले.
मागील आठवडयात तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील तापोळा महाबळेश्वर व कुंभरोशी तापोळा या दोन प्रमुख राजमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोळण्याच्या घटना घडल्या होत्या. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे साधारण 1 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर येथील पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांच्या बरोबर तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी केली.
यावेळी शाखा अभियंता दिनेश पवार, कनिष्ठ अभियंता धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाळयात होणारे नुकसान टाळण्यासाठी सभापती संजय गायकवाड यांनी सुचविलेला उपाय योग्य आहे ज्या ठिकाणी मोरया आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे पुल बांधले पाहीजेत या साठी लागणारे प्रस्ताव तयार करून ते शासनाला सादर करण्याचे आदेशच त्यांनी महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांना दिले. तर, तालुक्यातील विविध रस्त्यांवर आठ ते दहा ठिकाणी अशा प्रकारे लहान लहान पुल बांधावे लागतील अशी माहीती उपविभागीय अभियंता गोंजारी यांनी यावेळी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









