पालिकेची जागा गलपटण्याचा प्रकार उघडकीस, सुनावणीवेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्थावर जिंदगी विभागास फटकारले, सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी केली आहे तक्रार
सातारा / प्रतिनिधी
शहरात भर वस्तीत पालिकेच्या जागेत जुना मोटर स्टँड येथे पेट्रोल पंप सुरू आहेत.पालिकेची मोकळी जागा तीन वर्षांच्या कराराने दिली होती.त्याचा ठराव नंबर आहे पण ठरावच नाही, अशी बाब सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी उघडकीस आणली आहे.त्यांनी केलेल्या तक्रारींवर सातारा पालिकेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे सुनावणी झाली.त्यांनी स्थावर जिंदगी विभागास फटकारले आहे.दरम्यान, पालिकेची जागा गलपटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, सातारा पालिकेची जुना मोटर स्टँड येथील खुली जागा भाड्याने देण्याचा करार दि.7नोव्हेंबर 2001 ला झाला.प्रकाश विठ्ठलदास पारेख यांनी ती जागा तीन वर्षांच्या मुदतीसाठी घेतली होती.दि.12ऑक्टोबर2001 ला लिलाव झाला होता.त्यात 13 हजार500 रुपये जमा करून ती जागा ताब्यात घेण्यात आली.त्या लिलावबाबत विशेष सभेत ठराव क्रमांक 1417 घेण्यात आल्याचे दि.6 सप्टेंबर2001च्या सभेत म्हटले आहे.परंतु प्रत्यक्षात तसा कोणताही ठराव पालिकेकडे नाही.ती खुली जागा वापरण्यास नियम होते.कोणतेही पक्के बांधकाम करता येणार नाही.परंतु तेथे चक्क पेट्रोल पंप उभारण्यात आला.तत्कालीन स्थावरच्या विभाग प्रमुख यांनी पैशाच्या लालसेने त्यांना सहकार्य केले आहे.तसेच जागेचा वापर हा दुकानाकारता करावा असा उल्लेख असताना कसा पेट्रोल पंपासाठी वापर झाला.याबाबत झालेल्या सुनावणीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्थावर विभागास फटकारले आहे.
एकदा दुर्घटना टळली
जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंपात इंधन भरत असताना आग लागण्याची घटना पाठीमागे 2008च्या दरम्यान घडली होती. वेळीच प्रसंगावधान राखल्याने काहीही झाले नव्हते. मात्र,पालिकेने ही जागा दुकानासाठी तीन वर्षांच्या कराराने दिली असताना तेथे चक्क पेट्रोल पंप उभा राहिला.त्यात कोनाकोणाचे हात ओले झाले आहे हा ही संशोधनाचा विषय आहे.
Previous Articleसोलापूर : बॅडमिंटन,जलतरण खेळास परवानगी : जिल्हाधिकारी
Next Article कोरोनामुळे औंध संगीत महोत्सवाचा सूर झाला बेसूर









