सातारा/प्रतिनिधी (संग्रहित छायाचित्र )
दरवर्षी सातारा तालुक्यातील डोंगरी भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. तेथील ग्रामपंचायतीकडून टँकरची मागणी केली जाते. यावर्षी ही मागणी आल्यानुसार एका गावात सातारा पंचायत समितीकडून टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी दिली.
सातारा तालुक्यातील डोंगरी भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते.यावर्षी आवाडवाडीने मागणी केल्यानुसार टँकर सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसात पिसानी चोरगेवाडीला टँकर सुरू करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील 14 गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये वणें, दरे बुद्रुक, गजवडी, जांभळेवाडी, खडगाव, पाडळी, खोडद, कारी, कामथी तर्फ सातारा, आव्हाडवाडी, चोरगेवाडी, शिंदे वाडी, कुमठे, बोरणे, ठोसेघर (गायकवाड वस्ती), परमाळे, पाटेश्वरनगर, भरतगाववाडी अशी आहेत. या गावात मागणी नुसार विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहीर मारणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी बाबींची कार्यवाही सुरू आहे, असे ढमाळ यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








