प्रतिनिधी / सातारा
खाकी वर्दीच्या समय सूचकतेचे व सातारा तालूका डि.बी.चे सर्वत्र कौतूक सूरु आहे. काल ट्रकचालकास लूटमार करणाऱ्या टोळीस सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाने अवघ्या काही तासांमध्ये ताब्यात घेऊन हा गुन्हा उघड केला. याबद्दल महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे प्रकाश गवळी यांनी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, पो. उप. निरीक्षक अमित पाटील व त्यांचे डि.बी पथकातील दादा परिहार, सुजित भोसले, सतीश पवार, नितीराज थोरात, सागर निकम यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीबाबत कौतुक केले.









