प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोना संसर्गाची साथ पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱयांनी 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱयानजिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डीमार्ट मॉलमध्ये ग्राहकांची गर्दी जमवून सुरक्षित अंतर नियमाचे पालन न केल्याने डीमार्ट मॉलच्या मॅनेजरवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी 7.45 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डी मार्ट मॉल म्हसवे, ता. सातारा येथे ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स राहील याबाबत कोणतेही उपाय योजना न करता ग्राहकांची गर्दी झाली होती. यावेळी पेट्रोलिंग करणाऱया पोलीस कर्मचाऱयांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सूचना केल्या.
मात्र डीमार्टमध्ये जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार महिला पोलीस कॉन्स्टेबल जोत्स्ना मुंढे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर मॅनेजर सौरभ अरुणराव होनगी (रा. आदर्श नगर, प्रीती एक्झिक्युटीव्ह हॉटेल शेजारी, सातारा) आणि अनुप चंद्रकांत चौकटे (रा. मातोश्री पार्क डी मार्ट पाठीमागे म्हसवे, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.








