प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व विषय समितीच्या सभांना मनाई करण्यात आली होती. त्या सभा ऑनलाईन व्हीसीद्वारे होत होत्या. काही सदस्य तर जिल्हा परिषदेकडे फिरकलेही नव्हते. तर काहींचे मात्र नेहमीच उठबस सुरु असायची. तब्बल नऊ महिन्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेस प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. ही सभा दि.8 रोजी होत आहे. त्या सभेची रंगीत तालिम उद्या होत आहे. केवळ दिडशे व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभां आणि विषय समितीच्या सभांना सुरुवातीला ब्रेक लागला होता. पुन्हा राज्य शासनाच्या सुचनेनुसार ऑन लाईन सभा घेण्यास मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण आणि विषय समितीच्या सभा या ऑनलाईन द्वारे घेण्यात येत होत्या. त्यावेळी रेंजची समस्या काही सदस्यांना येत होती. आता तब्बल 9 महिन्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला प्रत्यक्ष उपस्थिती राहून परवानगी दिली आहे.ही सभा दि. 8 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होत आहे. या सभेकरता दीडशे लोकांना उपस्थित राहून परवानगी देण्यात आली आहे. त्या व्यतिरीक्त कोणत्याही व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वेगवेगळय़ा वेळेत उपस्थित राहण्यासाठी सांगावे, सोशल डिस्टन्सचे पानलन करण्याच्या अनुषंगाने बैठक संपल्यानंतरही सर्व सदस्यांना एकाच वेळी बाहेर पडणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्यात यावी, सभेच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीत कमी 2 खुर्च्यांचे अंतर राहिल. याप्रमाणे बैठक व्यवस्था करुन सभेच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात यावे, सॅनिटायझर वापर करणे बंधनकारक आहे. नाकातोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक राहिल, अशा सुचना देवून परवनागी देण्यात आली आहे. त्यामुळे या सभेची रंगीत तालिम उद्या शुक्रवारी होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









