पुढचे वाहन न दिसल्याने झाला अपघात, राजवाडा बसस्थानकातले अतिक्रमणाचा पुन्हा मुद्दा एरण, दुपारी दुसरे नगरसेवक शिडीवरून पडल्याने जखमी
सातारा / प्रतिनिधी:
सातारा शहरात राजवाडा बसस्थानक परिसरात कोपऱ्यात असलेल्या पोलीस चौकीच्या खोक्यामुळे पुढून येणारे वाहन दिसले नसल्याने त्या खोक्याबाबत तक्रार करणारे नगरसेवक अविनाश कदम यांचा दुचाकी घसरून अपघात झाला.त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत.या घटनेमुळे या परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एरणीवर येणार आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत दुसरे एक नगरसेवक शिडीवरून पडून जखमी झाले आहेत.
नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी राजवाडा बसस्थानकातल्या अतिक्रमणाबाबत पालिकेकडे तक्रार केली होती.आज सकाळी ते मंगळवार तळे रोडवरून राजवाडा बसस्थानकाच्या चांदणी चौकातून वळत होते.त्यांना समोरून आलेली गाडी त्या खोक्यामुळे दिसली नाही अचानक गाडी समोर दिसल्याने त्यांनी ब्रेक मारला अन गाडी घसरली.तेथे असलेल्या नागरिकांनी लगेच गाडी उचलली. अविनाश कदम यांच्या हाताला लागले.त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडून देण्यात आले.मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा अतिक्रमणाचा ऐरणीवर आला आहे.
जेष्ठ नगरसेवक घरातच शिडीवरून पडले
दुसरे नगरविकास आघाडीचे नगरसेवक ही घरातच काहीतरी काम करत होते.त्यावेळी शिडीवर चढत असताना घसरले अन जखमी झाले.त्यांच्यावर सातारच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









