शाहूपुरी : काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात आठवड्याहून अधिक काळ ढगाळ वातावरण आहे.
त्याचबरोबर काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे. यामुळे हरभरासह काही फळबागांनाही धोका उद्भवू शकतो. वातावरण असेच राहिल्यास पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात सतत वाढ होत आहे. पहाटेची थंडी आहे. आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने दिवसा गरमी वाटत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरण होत आहे. रात्री थंडी वाजत आहे. वातावरणात रोज काहीतरी बदल जाणवत आहे. हे वातावरण रब्बी पिकांना मारक ठरत आहे.









