सातारा / प्रतिनिधी :
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना १७ ऑकटोबर रोजी बातमी मिळाली होती की, गोळेश्वर (ता कराड जि.सातारा) या गावचे हद्दीतील सज्जाद युनुस कच्छी यांचे मालकीचे माया एलाईटी काँटी रोहाऊस नं.४ मध्ये काही इसम चेन्नई विरुध्द दिल्ली या २०-२० आयपीएल क्रिकेट सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दयारे संपर्क साधुन सट्टा नावाचा जुगार चालवित आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकणेबाबत सुचना दिल्या. सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी व त्यांचे पथकाने गोळेश्वर कराड हद्दीतील मिळाले बातमी ठिकाणी सापळा लावुन छापा टाकला असता तेथे चार इसम हायप्रोफाईल पध्दतीने चेन्नई विरुध्द दिल्ली
या २०-२० क्रिकेट आयपीएल सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दयारे सट्टा नावचा जुगार चालवित असताना मिळुन आले त्यांचेकडे १ एलसीडी व सेट टॉप बॉक्स, १ लॅपटॉप, ०९ मोबाईल फोन, टु व्हिलर गाडया, रोख रक्कम व जुगार साहीत्य असा एकुन ४ लाख 2 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वशीम इकबाल मोमीन (वय 33), समीर जावेद शेख (वय 30), मुनिर दस्तगिर चबनुर(वय 29), जैद जल्लालउद्दीन पालकर(वय22 सर्व रा.कराड) अशी त्या चौघांची नावे आहेत.
Previous Articleसोलापूर ग्रामीण भागात 252 रुग्ण कोरोनामुक्त, 120 नवे बाधित
Next Article पुलवामात CRPF च्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला; जवान जखमी









