सातारा / प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर असलेला कोरोना कक्ष सोशल डिस्टनन्स व सुरक्षिततेच्या कारणास्तव के.बी.पी.कोलेजमध्ये हलवण्यात आला आहे. दोन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा पहिल्या मजल्यावर आहे.त्याच विभागात कोरोना कक्ष करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे अनेक विभागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आपल्यापासून इतरांना धोका नको म्हणून जिल्हा परिषदेतील कोरोना कक्ष हा केबीपी कॉलेजमध्ये तळमजल्यावर हलवला आहे. हा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









