प्रतिनिधी/ सातारा
मागील काही दिवसांपुर्वी ठाणे परिसरात बर्ल्ड फ्लूच्या घटना घडल्या होत्या. पण योग्य ती खबरदारी घेऊन संबंधीत पक्षी नष्ट करण्यात आले. पण काही दिवसांपासुन सातारा जिल्हय़ातील ही बर्ल्ड फ्लु बाबतच्या खोटी माहितीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण साताऱयात बर्ल्ड फ्लुचा कोणताच धोका नसल्याची माहिती पशुविभागातर्फे देण्यात आली आहे.
तसेच अशा प्रकारे खोटी माहिती देण्याचे व्हिडीओ व्हायरल करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची सुचना ही देण्यात आली आहे. जिल्हय़ात बर्ल्ड फ्लु बाबत अद्याप एकही प्रकरण घडले नाही. त्यामुळे खवय्यांनी अगदी बिधास्तपणे आपल्या आवडत्या खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घ्यावा.
मागील वर्षी ही अशाच प्रकारे बर्ल्ड फ्लू बाबतच्या अफवा जिल्हय़ात सर्वत्र पसरल्या होत्या. त्यामुळे अनेक लहान-मोठय़ा पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. आधिच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या व्यवसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यातच बर्ल्ड फ्लु बाबतच्या अफवांमुळे त्यांचे व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक व्यवसायीक हे कर्जबाजारी झाले होते. पुन्हा अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱयांवर योग्य ती कारवायी करण्याची मागणी ही या व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.