प्रतिनिधी / सातारा
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परिक्षा उद्या रविवार दि. 13 रोजी होणार आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल या परिक्षेसाठी जिह्याचे समन्वयक आहे. जिह्यातील 13 केंद्रावर सहा हजार विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याची माहिती प्राचार्य ए. के. सिंग यांनी दिली.
जिह्यात पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, सुखात्मे स्कूल लिंब सातारा, सी. एस. कॉलेज सातारा, केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज सातारा, श्रीमंत अभयसिंहराजे टेक्निकल कॉलेज शेंद्रे, अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेज सातारा, यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इनव्हर्सल स्कूल सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या केंद्रावर परीक्षा होणार आहे.
विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवेशद्वारातच प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंगसुद्धा केले जाणार आहे. परिक्षा कक्षामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट परिक्षार्थ्यांना परीक्षा कक्षापर्यंत पोचणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. परीक्षार्थ्यांना आपल्यासोबत प्रवेशपत्र, फोटो, तसेच ओळखीचा पुरावा सोबत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









