सातारा / प्रतिनिधी
जिल्हय़ात एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 275 झाली असून त्यापैकी 4 हजार 223 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. कोरोनामुक्तीची टक्केवारी एकीकडे वाढू लागली असताना दुसरी वाढता मृत्यूदर जिल्हय़ात चिंता निर्माण करत आहेत. मंगळवारी 11 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 260 झाली आहे. वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला कंबर कसावी लागणार आहे. दरम्यान, जिल्हय़ातील नागरिकांनी पॅनिक होवू नये, माझी प्रकृती स्थिर असल्याचा दिलासा देत पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.
कोरोना मुक्तीचा वेग दिलासा देत असला तरी वाढवण्यात आलेल्या तपासण्यांमुळे बाधितांचा आकडाही वाढतच आहे. सोमवारी रात्रीच्या अहवालात 290 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर मंगळवारी दिवसभरात 46 एवढे तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 346 असा एकूण 392 एवढय़ा मोठ्या संख्येने नागरिकांचा अहवाल बाधित आला आहे. तर मंगळवारी 226 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात करत या लढाईतील दिलासा कायम ठेवला आहे.
जिल्ह्यातील 226 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 41, खंडाळा तालुक्यातील 27, खटाव तालुक्यातील 3, कोरेगाव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 26, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 21, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 29, वाई तालुक्यातील 26 असे एकूण 226 नागरिकांचा समावेश आहे.
जिल्हय़ात 11 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सरताळे, ता. जावली 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा 72 वर्षीय पुरुष, नेले ता. सातारा 75 वर्षीय महिला, फलटण 60 वर्षीय महिला व राजेवाडी निगडी ता. सातारा 70 वर्षीय पुरष अशा एकूण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच कराड खाजगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण 69 वर्षीय पुरुष, वाईत रुग्णालयात महाबळेश्वर 80 वर्षीय पुरुष व सातारा खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर 51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा 76 वर्षीय पुरुष, घिगेवाडी ता. कोरेगाव 64 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
मंगळवारी 46 जणांचा अहवाल बाधित
सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांच्या अहवालानुसार 46 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या अहवालामध्ये, जावली तालुक्यातील भणंग 1,कुडाळ 3, खर्शी 1, मोरघर 1. कराड तालुक्यातील चोरे 1.खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, स्टार सिटी 1, सुंंदर नगरी 1. खटाव तालुक्यातील अंबवडे 1, गुरसाळे 1, मायणी येथील 1. कोरेगाव तालुक्यातील कुमठे 1, सोनके 1, अपशिंगे 1, सोळशी 1. माण तालुक्यातील भालवडी 1. पाटण तालुक्यातील सणबुर 1, पुरफोळे 1. फलटण तालुक्यातील मारवाड पेठ 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, विडणी 1, रिंगरोड 1, खाटीक गल्ली 7, मलठण 2. सातारा तालुक्यातील गवडी 1, मालगाव 1, कोडोली 1, संभाजी नगर 1, कामाठीपुरा 1, रामचौक 1, नेले 1, गणेश कॉलनी 1. मंगळवार पेठ 1. वाई तालुक्यातील उडतरे 2.
कराडमध्ये आतापर्यंत एकूण 835 मुक्त
कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी 27 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये मलकापूर 35 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, इंदोली 28 व 25 वर्षीय पुरुष, वडोली 75 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड 40 वर्षीय पुरुष, चोरे 44 वर्षीय पुरुष, तारुख 44 वर्षीय पुरुष, येळापूर शिराळा 54 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड 33, 55, 69, 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड 55 वर्षीय महिला, चोरे 44 व 50 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल 29 व 70 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड 35 वर्षीय महिला, कराड 70 वर्षीय महिला, वाठार 30 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 37 वर्षीय महिला, उंब्रज 50 वर्षीय पुरुष, हणबरवाडी 24 वर्षीय महिला, बेलवडे पाटण 25 वर्षीय महिला, मलकापूर 25 वर्षीय महिला, वेजेगाव खानापूर 23 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 835 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सातारा, कराड, वाई, जावलीत वाढ सुरुच
जिल्हय़ात हॉटस्पॉट ठरलेल्या कराड व त्यापाठोपाठ साताऱयात वाढणारी बाधितांची संख्या चिंताजनक आहे. रुग्ण कोरोना मुक्त होत असले तर संसर्ग वाढूच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर वाई, जावली, फलटण कमी प्रमाणात असली तरी बाधितांची संख्या वाढतच आहे. तर खटाव, माण, खंडाळा सावरु लागला असला तरी संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यकच असून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. साताऱयासह कराडमध्ये विशेष उपाय योजना कराव्या लागणार असून नागरिकांनी देखील नियम पाळावेच लागतील.
गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस बाधित
राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्यात सगळ्यात पुढे असणाऱया काळ्या रंगांच्या पायलट गाडी स्कार्पिओतील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस जवान बाधित झाले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान सातारा शहर वाहतूक शाखेतील चार जवान कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांना सौम्य लक्षणे असून त्यांच्या सहवासात आलेल्यांची कोरोना टेस्ट होणार आहे. कोणीही कर्मचारी बाधित होवू नयेत यासाठी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार काळजी घेत आहेत.
कराडला बंदोबस्तावरील दोन पोलीस बाधित
कराडला कोरोनाचा उद्रेक सुरुच असून लॉकडाऊन शिथिल झाल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण चांगलाच वाढला आहे. दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारी एक महिला पोलीस कोरोना बाधित झाली आहे. ही महिला पोलीस पोलीस वसाहतीत वास्तव्यास असते. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला एक पोलीस कर्मचारीही कोरोना बाधित झाला असून हा पोलीस कर्मचारी कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून सातत्याने बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत आहे.
कराड तालुका एकूण 1703
कराड तालुक्यात कोरोनाने बाधित होण्याचा वेग कायम असून मंगळवरी 1703 इतकी एकूण रुग्णसंख्या झाली आहे. यात कराड शहरात 434 रुग्ण असून मलकापूरमध्ये 202 रुग्ण आहेत. तर कराड तालुक्यात 1 हजार 67 रुग्ण आहेत. एकूण 123 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यात 885 जण उपचार घेत आहेत.
बावधन बनू लागले हॉटस्पॉट
लॉकडाऊन उठल्यावर वाई तालुक्यात मोठया असलेल्या बावधन गावात कोरोनाचा शिरकाव झाला. एकेक रुग्ण वाढू लागला. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही त्या आरोग्य केंद्राचीच ग्रामस्थांनी कोरोनामुळे धास्ती घेतली आहे. आशा वर्कर अंगणवाडी सेविका सर्व्हे करतात. परंतु ग्रामस्थ काळजी घेत नसल्याने रुग्ण वाढत चालले आहे. दि. 14 रोजी एकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घरातील बाधित आढळून आले आहेत. गावात बधिताचा आकडा 30 वर पोहचला आहे. कालच्या दिवसात एकदम 12 रुग्ण वाढले आहेत.
सोमवारी रात्रीच्या अहवालात 290 बाधित
कराड तालुका 123 बाधित : सैदापूर 4, रेठरे कारखाना 1, कराड 16, मलकापूर 11, तावडे 1, आगाशिवनगर 3, वाठार 1, सोमवार पेठ कराड 6, नांदलापूर 1, गोटे 3, शनिवार पेठ कराड 5, आटके 1, मंगळवार पेठ 6, वडगाव 1, काले 1, एचडीएफसी बँक 7, विरवडे 1, उंब्रज 1, तळबीड 2, चरेगाव 1, शिवदें 1, गोवारे 1, मालखेड 1, रविवार पेठ 4, रुक्मिणीनगर 2, बुधवार पेठ 6, शुक्रवार पेठ 2, मसूर 1, चोरे 6, कराड शहर पोलीस 2, वाघोरी 4, साळशिरंबगे 1, धोंडेवाडी 1, कापील 1, साकुर्डी 2, सह्याद्री हॉस्पीटल 1, कार्वे 1, कालिदास मार्केट 1, कोनेगाव 1, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, वाकन रोड 3, टाळगाव 1, गोळेश्वर 1, बाबरमाची 1,
सातारा तालुका 49 बाधित : दौलतनगर 1, कामाठीपुरा 1, किडगाव 1, सातारा 2, भवानी पेठ 1, शाहूनगर 2, खेड 1, पोलीस लाईन 1, दरे ब्रु 1, तामजाईनगर 1, वाहतूक पोलीस 1, वडोली 1, विलासपूर 1, शनिवार पेठ 1, वडगाव 1, गुरुवार पेठ 1, अतित 15, वाढे 5, विकासनगर 1, वळसे 1, नांदगाव 2, मल्हारनगर 1, केसरकर पेठ 1, सोमवार पेठ 1, शिवथर 1, गोडोली 1, देशमुख कॉलनी 1, राजसपुरा पेठ सातारा 1.
फलटण तालुका 28 बाधित : फलटण 4, मलटण 1, मांडवखडक 1, विडणी 1, विडणी 1, लक्ष्मीनगर 2, मंगळवार पेठ 1, कोळकी 1, मारवाड पेठ 3, तरडगाव 1, ठकुबाची वाडी 1, तावडी 1, कसबा पेठ 1, तामखाडा 4, जिंती 1, निंबोरे 1, खेड बु 1, बिरदेवनगर 1, गिरवी 1.
वाई तालुका 26 बाधित : गंगापुरी 1, कवठे 1, रविवार पेठ 2, उडतारे 2, पांढऱयाचीवाडी 1, बावधन 12, पाचवड 1, शेंदुरजणे 2, धोम कॉलनी 1, ओझर्डे कदम वाडी 1, ब्राहणशाही 2. पाटण तालुका 12 बाधित : कालगाव 2, पाटण 4, पंच मोरगिरी 1, सांगवड 1, 1, दिवशी बु 1, दौलतनगर 1.
जावळी तालुका 16 बाधित : सरताळे 1, मेढा 2, गांजे 1, मोरघर 12. कोरेगाव तालुका 5 बाधित : कोरेगाव 1, विखळे 1, नायगाव 1, तहसील ऑफीस कोरेगाव 1, रहिमपूर 1. खटाव तालुका 16 : विसापूर 1, मोराळे 3, वडूज 1, वांजोळी 5, खटाव 1, तडवळे 2, उंबरडे 1, मायणी 1, राजाचे कुर्ले 1. माण तालुका : म्हसवड 3, मासाईवाडी 1. महाबळेश्वर तालुका : पाचगणी 1. इतर जि. चव्हाण वाडी आष्टा (सांगली) 1, रिळे ता. शिराळा 1, किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा 1.
743 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा 20, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 76, उपजिल्हा रुग्णालय फलटण 33, कोरेगाव 54, वाई येथील 35, खंडाळा 60, रायगाव 66, मायणी 54, महाबळेश्वर 30, दहिवडी 30,पानमळेवाडी 151, खावली 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 103 असे एकूण 743 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 37430
एकूण बाधित 8275
एकूण मुक्त 4449
एकूण मृत्यू 260
उपचारार्थ रुग्ण 3556
मंगळवारी
एकूण बाधित 392
एकूण मुक्त 232
एकूण बळी 11









