●वीस दिवसांत 105 मृत्यू
●अगोदरच्या चार महिन्यात 101 मृत्यू
●गुरूवारी 208 जणांना डिस्चार्ज
●247 जण बाधित
● कोरोना मुकतांचा आकडा तीन हजारावर
प्रतिनिधी/सातारा
चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारच्या अहवालात 304 इतके बाधित आले होते. तर गुरूवारी रात्री आलेल्या अहवालात 247 इतके पॉझिटिव्ह आले आहेत. तरीही क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयाच्या लॅब चे रिपोर्ट येणे बाकी होते. जिल्हय़ात गुरूवारी 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. आज उच्चांकी 208 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून मुक्तांचा आकडा तीन हजारावर गेला आहे. बाधितांचे आकडे वाढत असले तरी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
गेल्या वीस दिवसांत मृत्यू वाढले
सातारा जिल्हय़ात कोरोनाने मृत्यू होणाऱया रूग्णांचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे. आकडे वाढत असले तरी मृत्यूदर कमी व्हावा, अशी प्रार्थना जिल्हावासिय करत आहेत. 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. 24 जुलैपर्यंत 4 महिन्यांत 101 मृत्यूंची नोंद होती. मात्र 24 जुलै ते 13 ऑगस्ट या दिवसांत 105 मृत्यू झाले आहेत. पहिला शंभरचा आकडा गाठण्यासाठी चार महिने तर दुसरा शंभरचा आकडा गाठण्यासाठी केवळ 20 दिवसांचा कालावधी लागला आहे. यावरून जिल्हय़ात कोरोनाचे उग्र रूप पाहावयास मिळत आहे. हा आकडा शासकीय आकडेवारीवरून असला तरी वेळेत उपचार न मिळालेल्या कोविड आणि नॉन कोविड रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाचण्या वाढल्या, बाधित वाढतील, घाबरू नका-जिल्हाधिकारी
सातारा जिल्हय़ात आजअखेर 206 मृत्यू झाले आहेत. जिल्हय़ाचा मृत्यू दर 3.9 टक्के असून तो राज्याच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. जिल्हय़ात ऍन्टीजन चाचण्यांची किट प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. खासगी रूग्णालये, खासगी लॅबला कोविड चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्या वाढल्या असून बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी 279 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासाठी बुधवारी एकुण 1800 जणांची चाचणी करण्यात आली होती. प्रारंभी जिल्हय़ात केवळ 300 ते 350 चाचण्या होत होत्या. त्यामुळे चाचण्यांची संख्या जशी वाढेल, तशी बाधित संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
आरटीपीसीआर लॅबची चाचणी क्षमता वाढवणार
सातारा येथे आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबमध्ये रोज 200 ते 250 चाचण्या होत आहेत. या लॅबची क्षमता लवकरच वाढवून 350 ते 370 चाचण्या करण्यात येणार आहेत. जिल्हय़ात टेस्टिंगची क्षमता वाढवली असून लक्षणे जाणवल्यानंतर संबंधितांनी तातडीने चाचण्या केल्या पाहिजेत. लवकर निदान होण्याने प्रशासनाला व संबंधित रूग्णाला तातडीने उपचार मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
जिल्हय़ात 9 जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील येथे नरवणे (ता. माण) येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी (ता. पाटण) येथील 69 वर्षीय पुरुष, मुंबई येथून प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदंर्भीत केलेल्या 38 वर्षीय पुरुष अशा 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये सह्याद्रीनगर वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 75 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ कराड येथील 69 वर्षीय पुरुष व काळगाव (ता. पाटण) येथील 85 वर्षीय पुरुष व गोटे (ता. कराड) येथील 70 वर्षीय पुरुष या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी कळविले आहे. याबरोबरच एकुण आकडा 206 इतका झाला आहे.
208 नागरिकांना दिला डिस्चार्ज
गुरूवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 208 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंतचा हा आकडा उच्चांकी आहे.
जावली तालुक्यातील 11, कराड तालुक्यातील 57, खंडाळा तालुक्यातील 24, खटाव तालुक्यातील 7, कोरेगाव तालुक्यातील 26, महाबळेश्वर तालुक्यातील 5, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 3, फलटण तालुक्यातील 25, सातारा तालुक्यातील 26, वाई तालुक्यातील 21 असे एकुण 208 नागरिकांना डिस्चार्ज समावेश आहे.
574 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 93, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 32, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 53, वाई येथील 76, शिरवळ 29, रायगाव 20, पानमळेवाडी येथील 68, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 90, खावली 12, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 48 असे एकूण 574 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
279 संशयितांचे अहवाल बाधित
जिह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 279 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालुक्यातील आसवली 20 वर्षीय पुरुष, चोरे 68 वर्षीय महिला, जुलेवाडी 37 वर्षीय महिला, अनतावाडी 51 वर्षीय पुरुष, विद्यानगर 52 वर्षीय पुरुष, मलकापूर 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 40 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 77 वर्षीय पुरुष, रविवार पेठ 45 वर्षीय पुरुष, मलकापूर 36 वर्षीय पुरुष, कराड 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 28 वर्षीय पुरुष, माकेट यार्ड, कराड 32 वर्षीय पुरुष, कराड 77, 38, 60 वर्षीय महिला, येरावळे 53 वर्षीय महिला, मलकापूर 53 वर्षीय पुरुष, काले 55 वर्षीय पुरुष, कपील 44 वर्षीय पुरुष, सैदापूर 49 वर्षीय पुरुष, कपील 47 वर्षीय महिला, मलकापूर 52 वर्षीय महिला, सैदापूर 46 वर्षीय महिला, शनिवार पेइ 36 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 24 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराउ 65 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड कराड 10 वर्षाचा मुलगा, नायगाव 51 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला, वडगाव 35 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड 25 वर्षीय महिला, यनके 80 वर्षाचा पुरुष, 70 वर्षाची महिला, नाडगाव 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 38 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर 40 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड 27 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका 34 वर्षीय पुरुष, कराड 35 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी कराड 26 वर्षीय पुरुष, कालवडे 65, 30 वर्षीय महिला, 18, 14 वर्षाचा पुरुष, 42, 19, 52 वर्षाची महिला, 21, 27, 54, 60 वर्षाचा पुरुष, सावड 27 वर्षीय पुरुष, वडज 48 वर्षीय पुरुष, बेलवडे बु 89, 13 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, सैदापूर 49 वर्षीय महिला, टेंभू 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ 14 वर्षाचा युवक, मंगळवार पेठ 57 वर्षीय महिला, बेलवडे 44 वर्षीय पुरुष, गुणेवाडी 45 वर्षीय महिला, शनिवार पेठ 23 वर्षीय पुरुष, गोटे 62 वर्षीय महिला, पेटशिवापूर 27 वष्रीय पुरुष, मलकापूर 63 वर्षीय पुरुष, वंडोली 23 वर्षीय महिला, सोमवार पेठ 45 वर्षीय पुरुष, काले 56 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत 22 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 67 वर्षीय पुरुष, माड्रुल कोळे 55, 79, 21 वर्षीय महिला, रविवार पेठ 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 74 वर्षीय पुरुष, कराड 35 वर्षीय महिला, पाली 35 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील सोनगिरीवाडी 43 वर्षीय पुरुष, फुलेनगर 27 वर्षीय महिला, रविवार पेठ वाई 35 वर्षीय पुरुष, यशवंतनगर 63 वर्षीय पुरुष, गंगापुरी 26 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर यैथील 30 वर्षीय महिला, वरागडेवाडी 30 वर्षी महिला, किसनवीरनगर वाई 66 वर्षीय पुरुष, उडतारे 75 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील रविवार पेठ फलटण 31 वर्षीय पुरुष, तामखंड 25, 20 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण 46 वर्षीय पुरुष, सीमेंट रोड फलटण 52 वर्षीय पुरुष, मलटण 28 वर्षीय पुरुष, 50 वर्षाची महिला.
सातारा तालुक्यातील शनिवार पेठ, सातारा 54 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा 43 वर्षीय पुरुष, सातारा 30 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा 36 वर्षीय पुरुष, सातारा 50 वर्षीय महिला, सातारा 57, 58 वर्षीय पुरुष, खडकी 28 वर्षीय पुरुष, वाढेफाटा 31 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा 53 वर्षीय पुरुष, देवी चौक सातारा 75 वर्षीय पुरुष, डबेवाडी 70 वर्षीय महिला, अतित 20 वर्षीय महिला, 84, 33, 60 वर्षीय महिला, 55, 36, 66, 16, 51 वर्षीय पुरुष, धावडशी 50, 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, निगुडमाळ 36 वर्षीय पुरुष, अतित 47 वर्षीय पुरुष, शाहुपरी सातारा 50 वर्षीय पुरुष, नागठाणे 14, 15 वर्षाची युवती, 11 वर्षाचा मुलगा, शाहुपरी 20 वर्षाची महिला, नागठाणे 20 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, वासोळे 25 वर्षीय पुरुष, नागठाणे 65 वर्षीय महिला, वासोळे 18 वर्षाचा पुरुष, 45 वर्षीय महिला, शाहुपरी 13, 43, 41, 5 वर्षीय महिला, शिवथर 16 वर्षाचा मुलगा, 70, 20 वर्षाची महिला, 17 वर्षाचा पुरुष धावडशी 28 वर्षीय पुरुष, सैदापूर 43 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा 68 वर्षीय पुरुष, व्यापार पेठ सातारा 72 वर्षीय महिला, संगमनगर 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर 54 वर्षीय पुरुष, संगमनगर 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी 56 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ 50 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ 75 वर्षीय महिला, शरिवार पेठ सातारा 51, 62, 27, 5, 40, 9, 24, 48 वर्षीय पुरुष, 23, 21, 19, 55, 25, 57, 39 13,3, 30, 25, 18 वर्षीय महिला, गोडोली 37 वर्षीय पुरुष, भरतगाववाडी 37 वर्षीय महिला, करमाळा 47 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 58, 56 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 55 वर्षीय महिला धनगरवाडी 12 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाची मुलगी, 65 वर्षाची महिला, 5 वर्षाचा बालक, 30 वर्षाचा पुरुष, पळशी 22 वर्षाची महिला, 35 वर्षाचा पुरुष, शिंदेवाडी 65 वर्षीय पुरुष, जावळे 34 वर्षीय पुरुष, शिरवळ 32 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 5 वर्षाची बालिका, लोणंद 27 वर्षीय महिला, शिरवळ 5 वर्षाचा बालक, 23 वर्षाचा पुरुष, 45 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 19 वर्षाची महिला, 10 वर्षाचा बालक, 40 वर्षाचा पुरुष, 20 वर्षाचा पुरुष, 16 वर्षाचा युवक, 69 वष्रीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, लोणंद 36, 42, 28 वर्षीय पुरुष, दारे खु 23, 20 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, खंडाळा 53 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, पळशी 33 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु 40 वर्षीय पुरुष, रहिमपूर 75 वर्षीय महिला, विद्यानगर कोरेगाव 34 वर्षीय महिला, कुमठे 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, रहिमपूर 30, 38, 58 वर्षीय पुरुष, 3 वर्षाचा बालक, 10, 9 वर्षाचा मुलगा, 17, 28, 30 वर्षाची महिला, कोरेगाव 36 वर्षाचा पुरुष, कोरेगाव 75 वर्षीय पुरुष,
माण तालुक्यातील म्हसवड 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील कुडाळ 46 वर्षीय महिला,56, 23 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील गारवाडे 50 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ 32 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी 54 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 47, 16, 39,, 51, 43, 6, 4041, 9,42, 12 पुरुष व 1 पुरुष , 32, 9, 35, 46,9,6 वर्षीय महिला, नगरपालिका 56, 53, 53, 53, 47, 12, 32, 29 वर्षीय पुरुष तळदेव 38 वर्षीय पुरुष, देवळी 45 वर्षीय पुरुष, बेल ऐअर हॉस्पीटल पाचगणी 29 वर्षीय पुरुष खटाव जयगाव 30 वर्षीय पुरुष, येळीव 27, 30 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला शिराळा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष, चिंतामणी नगर सांगली 60 वर्षीय पुरुष.
जिल्हय़ात गुरूवारी
एकुण बाधित 247
एकुण मुक्त 208
एकुण मृत्यू 09
जिल्हय़ात गुरूवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने — 34728
एकुण बाधित — 6504
घरी सोडण्यात आलेले — 3101
मृत्यू — 206
उपचारार्थ रुग्ण — 3197