प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 99 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 255 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 12, कराड तालुक्यातील 7, खंडाळा तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 2, कोरेगांव तालुक्यातील 3, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 5, पाटण तालुक्यातील 2, सातारा तालुक्यातील 20, वाई तालुक्यातील 19 असे एकूण 99 नागरिकांचा समावेश आहे.
255 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 35, खंडाळा 50, रायगांव 44, मायणी 70, महाबळेश्वर 40, असे एकूण 255 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 44378
एकूण बाधित — 13508
घरी सोडण्यात आलेले — 7208
मृत्यू — 382
उपचारार्थ रुग्ण — 5918
Previous Articleविरोधकांना हार पचवता आलेली नाही – मंगेश राजपुरकर
Next Article सातारा : प्रत्येक कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरु करावे









