प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 424 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 336 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
336 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14, कराड येथील 17, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 18, वाई येथील 11, खंडाळा येथील 21, रायगांव येथील 41, पानमळेवाडी येथील 54, मायणी येथील 17, महाबळेश्वर येथील 10, पाटण येथील 13, दहिवडी येथील 5, खावली येथील 9, तहमावले येथील 18, म्हसवड येथील 16 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 57 असे एकूण 336 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 197482
एकूण बाधित — 47169
घरी सोडण्यात आलेले -43104
मृत्यू — 1580
उपचारार्थ रुग्ण — 2485